चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे तसेच नवमतदार म्हणजेच युवा वर्गाचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ ही स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान करून देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी आपला सहभाग नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल रोजी २११८ मतदान केंद्रावर होणार असून सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. १८ वर्षांवरील प्रथम मतदार मोठ्या संख्येने असल्याने व युवकांमध्ये मतदानाप्रती उत्साह निर्माण होण्यासाठी प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.१९ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून ‘तुमचे मत द्या आणि आकर्षक बक्षीसे जिंका’ या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in/en/divisions/collector-office-contact-details/ तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.
नियोजनबद्ध पद्धतीने यात्रेची अंतिम तयारी पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर:३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रातील यात्रेसाठी चंद्रपूरात येणाऱ्या यात्रेकरूंना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी युद्धस्तरावर काम करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित...
जुगार व सट्टा व्यवसायाचा वाढता प्रभाव: कैलासवर कठोर कारवाईची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यात जुगार आणि सट्टा व्यवसाय दिवसेंदिवस बळावत चालला असून, या अवैध धंद्याचा प्रमुख सूत्रधार कैलास आपल्या व्यवसायाची ‘दुर्ग’ तयार करत आहे. पोलिसांकडून मोठ्या...
चंद्रपूर जिल्ह्याला देशातील पर्यटनाच्या नकाशावर आणा – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर:पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा घटक असून, चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाच्या अपार संधी उपलब्ध आहेत. हा जिल्हा देशाच्या मध्यभागी स्थित असून, कोणत्याही नैसर्गिक...
पडोली येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतीने अवैध व्यवसाय फोफावले; डिझेल साठ्याला भीषण...
नुकत्याच घडलेल्या घटनेत, चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील मोरवा परिसरात एका अवैध डिझेल साठ्याला भीषण आग लागली. ही घटना 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी घडली, ज्यामुळे परिसरात...
महाकाली यात्रेतील भाविकांच्या सोयीसाठी प्रभावी नियोजन करा – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूर:चैत्र महिना आला की, लाखो भक्तगण श्रद्धेने माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात येतात. या यात्रेची महती संपूर्ण देशात पोहोचावी आणि भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय मातेचे...