चंद्रपूर
प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 7000 किलोची खिचडी शिजवली. या खिचडीची उत्सुकता जिल्ह्याला लागली होती. शहरातील काही भागात खिचडी वाटपाचे स्टाल सुद्धा उभारल्या गेले. या स्टालवर खिचडी मिळेल यासाठी शहरवासियांनी गर्दी केली. मात्र स्टॉलवर खिचडी आलीच नाही. अनेकांना पाणी सुद्धा पिऊ दिल्या गेलं नाही. खिचडी वाटायचीच नव्हती, तर स्टाल उभे का केलेत? 7000 किलोची खिचडी नेमकी गेली कुठे ? असा प्रश्न आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील चांदा क्लब ग्राउंड इथं चांदा ऍग्रो कृषी महोत्सव सुरु आहे.या
महोत्सवात प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सात हजार किलोची खिचडी बनविली.याची प्रसिद्धीही फार जोरात करण्यात आली.शहरातील अनेक भागात खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते.या खिचडीचा स्वाद घेण्यासाठी शहरवासी रांगेत लागले होते.मात्र खिचडी स्टॉलवर पोहचलीच नाही.लावले स्टॉलवरील बॅनर कार्यकर्तानी हटविले.ज्यांनी स्वाद घेतला त्यांनी खिचडीच भरभरून कौतुक केलं. मात्र ज्याच्या हाती निराशा आली त्यांचा प्रतिक्रिया बघता
खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम झाला असेलही मात्र ही ” खिचडी ” शिजविण्यास जिल्हा प्रशासन असफल झाल्याचे चित्र.












