कोरपना तालुक्यातील पिर्पडा येथील शेतकरी खुशाल राठोड राहणार पिर्पङा यांनी ईश्वर कृष्णाजी रागीट डिक्रिधारी यांच्याकडून 93 94 मध्ये शेतीसाठी पीक लागवडी करिता बी बियाणे रासायनिक खते व औषधी असा 50 हजारांचा कर्ज घेतला होता ही रक्कम त्यांनी टप्प्या टप्प्याने 97 मध्ये परत केली असताना त्यांनी लाखो रुपयांचे कर्ज दाखवून त्यांनी न्यायालयात वसुलीसाठी खुशालू राठोड यांच्यावर वसुलीचा तगादा लावला होता याबाबत त्यांनी स्वतः भेट देऊन माझ्याकडे कर्ज नसताना तुम्ही मला कसे नोटीस पाठवता असे म्हटले असता.,
2015 मध्ये त्यांनी तू मला दिलेल्या पैशाचे पावत्या दाखवा अन्यथा तुझ्यावर मी कोर्टात दावा दाखल करतो असा दम भरला होता यामुळे तो सतत चिंतेत होता त्याला दोन-चार दिवसापूर्वी डिक्रीदारी यांनी 2020 यांनी धरखास्त क्रमांक 2/2020 नुसार कोर्ट विद्यमान श्री ए जे पाटिल् सह दिवाणी न्यायालय कोरपणा यांच्याकडून बजावणीचा हुकूम का देण्यात येऊ नये कारण दाखवण्यासाठी 20/2/2024 ला न्यायला समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळे तो 19 तारखेला मतदान केल्यानंतर रात्र पासून तो मी कर्जापाई त्रस्त अहो ईश्वर रागीट राहणार राजुरा हा माझा जीव घेत आहे म्हणून रात्रभर बडबड घरी केला व दिनाक 20 एप्रिल रोजी कुटुंबातील सर्व घरातील व्यक्ती शेताकडे गेले असता त्यांनी मी कोर्टात जाणार आहे मी तुम्ही शेताकडे जहा असे म्हटल्यावर घरचे सर्व शेताकडे निघून गेले असता.त्यांनी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विष प्राशन करून उलट्या करू लागला तेव्हा घरी असलेला नातू रडू लागला तेव्हा शेजारी इंदल राठोड यांनी पाहिले असता त्यांनी त्यांची प्रकृती पाहून तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे भरती केले मात्र त्यांची प्रकृती चिंतन जनक असल्याने जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले असता प्रवास करीत असताना रुग्णालय जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला ईश्वर रागीट यांच्या या पद्धतीच्या वसुलीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून न्यायालयाचा आधार घेऊन अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब छायाच छत्र हरपलं जात आहे ईश्वर रागीट यांच्या कारभारामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे दहशत असून खुशाल राठोड यांच्या मृत्यूला ईश्वर रागीट हा जबाबदार असल्याने तीनशे दोन गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी त्यांची पत्नी प्रेमा राठोड मुलगा प्रकाश राठोड यांनी मागणी केली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबित अली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तम पेचे भावराव चव्हाण संजय राठोड या कुटुंबाला तातडीने शासनाने मदत करावी व ईश्वर रागीट यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी होत आहे.