चंद्रपुर लोकसभा मतदार संघाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. मागील काही वर्षांमध्ये मतदानाची घटती टक्केवारी बघता यावर्षी ७५ टक्क्यांवर मतदान वाढविण्यावर प्रशासनाचा भर होता. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. एवढेच नाही तर मतदान करा, बक्षीस मिळवा ही योजनाही राबविण्यात आली. असे असले तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात तब्बल ५ लाख ९५ हजार ९५४ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख लाख ३७ हजार ९०६ मतदार आहेत. यात ९ लाख ४५ हजार ७३६ पुरुष मतदार, ८ लाख ९२ हजार १२२ स्त्री मतदार तर ४८ इतर मतदार आहेत. यातील ६ लाख ५८ हजार ४०० पुरुष मतदारांनी तर ५ लाख ८३ हजार ५४१ स्त्री मतदारांनी आणि ११ इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र एकूण मतदारांपैकी ५ लाख ९५ हजार ९५४ मतदारांनी मतदान केले नाही
यात २ लाख ८७ हजार ३३६ पुरुष
तर ३ लाख ८५ हजार ५८१ महिला
मतदारांचा समावेश आहे. ३७ इतर
मतदारांनी मतदान करणे टाळले.