संतनगरीत विकासाच्या नावावर नुसता गोंधळ : गावभर पाईप पुरलेत : खोदलेला रस्ता कधी बुजविणार ?

125

गोंडपिपरी

संतनगरी अशी ओळख असलेल्या धाबा गावात विकास कामाचा नावावर नुसता गोंधळ सुरु आहे. गावात पाणी पुरवठा करण्यासाठी वाढीव पाईपलाईन टाकल्या गेली. अंतर्गत रस्ते फोडल्या गेले. पाईप पुरलेत मात्र खोदलेले रस्ते पूर्वरत अद्यापही करण्यात आले नाही. खोदलेल्या या रस्त्यात पडून एकाचा जीव गेला, तशी चर्चा सुरु आहे.तर अनेकजण पडल्याने जखमी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे गावाकऱ्यांची ओरड होत असली तरी यावर ग्रामपंचायत बोलायला तयार नाही.यामुळे ग्रामपंचायत आणि ठेकेदाराचा ” अर्थ “पूर्ण संबंधाची चांगलीच चर्चा गावात रंगली आहे.

धाबा गावात करोडो रुपये खर्चून वाढीव पाईप लाईनचे काम सुरु आहे. या कामासाठी गावातील अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते फोडल्या गेले. पाईप टाकल्या नंतर रस्ते खोदल्या नंतर निघालेली माती त्यावर टाकून बुजाविल्या गेले. मात्र सिमेंट काँक्रीट रस्त्यात टाकलेले लोखंडी सलाखी दोन्ही बाजूनी पसरल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक पडलेत. काही जखमी झालेत. ग्रामपंचायतीला शिव्याशाप देत सुटलेत. या मार्गांवरून चालणे कठीण झाले आहे.अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी चुप्पी साधून आहेत. यावर कुणी बोलायला तयार नाही. माजी सरपंच, पदाधिकारयांचा तोंडी तक्रारीला कुणी ऐकेना अशी स्थिती आहे. त्यामुळे गावात संताप निर्माण झाला आहे.

bottom