चंद्रपूर जिल्ह्यातील ललित बनला लल्लन डाकू

झाडीपट्टी रंगभूमीवरील ललित बनला ललन डाकू

29758

News34 chandrapur

ललन डाकूच्या भूमिके मुळे चर्चेत आला ब्रम्हपुरीचा ललित

नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘घर बंदुक बिर्याणी‘ ७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून यात ब्रम्हपुरी मध्ये नेवजाबई हितकरिणी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या ललित मटाले याने ललन डाकुची भुमिका केली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असून झाडीपट्टीच्या रसिकांसाठी हा चित्रपट अभिमानाचा विषय बनला आहे. ghar banduk biryani marathi movie

या चित्रपटाचे नुकतेच चंद्रपूर येथे प्रमोशन झाले त्यासाठी सर्व कलाकार मंडळी चंद्रपुरात आली होती. त्यांच्यासह स्टेजवर ललित मटाले असणे ही चंद्रपूर जिल्हासाठी अभिमानाची बाब आहे अशी सर्वत्र चर्चा होत आहे. ललित ने आपले महाविद्यालीन शिक्षण ब्रम्हपुरी येथून पूर्ण केले आहे. परंतु लहानपणापासूनच अभिनय करण्याची आवड असल्याने ललितने अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी पुणे गाठले व ललित कला केंद्रातून नाट्यशास्त्राची पदवी संपादन केली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक नाटकातून तसेच बबन, अव्यक्त मेडीसिन लॅम्प अश्या चित्रपटातून त्याने भूमिका साकारल्या. आता ललित नागराज मंजुळे दिग्दर्शित आटपाट प्रोडक्शन व झी स्टुडिओच्या बॅनरखाली काम करत असल्याने झाडीपट्टीचा गौरव वाढला आहे .

झाडीपट्टी रंगभूमी माझी प्रेरणा आहे, नागराज मंजुळे सारख्या अभ्यासू वृत्तीच्या दिग्दर्शकाकडून मला अभिनयाच्या बऱ्याच गोष्टी शिकता आल्या.ते नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देत असतात.पुढे वास्तविक जीवनातील विविध पात्र रंगमंच व चित्रपटातून साकारण्याची इच्छा आहे. असल्याचे ललित मटाले म्हणाले.

bottom