चंद्रपूर महानगरपालिकेत निकृष्ट कामांसाठी ‘कुप्रसिद्ध’ महेश टिपलेवर अभियंत्यांची विशेष कृपा: चौकशीची नागरिकांची मागणी

41

चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सतत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या महेश टिपले या कंत्राटदारावर येथील अभियंत्यांची विशेष कृपा असल्याची चर्चा आहे. नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, टिपले याच्याकडून करण्यात आलेली बहुतेक कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची याबाबत मूकसंमती असल्याचे बोलले जात आहे. याचे कारण म्हणजे, टिपले यांच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांची टक्केवारी आणि भागीदारी असल्याचा आरोप होत आहे. मागील काही वर्षांपासून अशाच पद्धतीने टिपले यांनी मनपात आपली दुकानदारी सुरु ठेवली आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये निकृष्ट कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरीदेखील महेश टिपले यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने मनपाच्या अभियंत्यांवरही संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी महेश टिपले आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.महानगरपालिकेच्या कारभारातील या प्रकरणावर प्रशासनाने त्वरित दखल घेणे गरजेचे आहे, अशी सर्वसामान्यांची भूमिका आहे.

bottom