चंद्रपूर पोलीस दलातील दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात रामनगर पोलीस ठाण्यापासून आपल्या कारकिर्दीची उज्ज्वल छाप सोडणारे गाडे, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे नेतृत्व करताना गुन्हेगारीविरोधी मोहिमांसाठी ओळखले जातात.
बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी अनेक सैराट गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर वचक निर्माण केला. निवडणुकीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करून कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे बल्लारपूर परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश येण्यात मोठे यश मिळाले.सुनील गाडे हे त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती व प्रभावी नेतृत्वासाठी चंद्रपूर पोलीस दलात एक आदर्श म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.












