अभिलाषा गावतुरे (बेहेरे) यांना बहुजन समाज पार्टी BSP यांनी बिनशर्त पाठिंबा दर्शविला

47
Oplus_131072

चंद्रपूर :- बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे (बेहेरे) Abhilasha Gavture यांना बहुजन समाज पार्टी BSP यांनी बिनशर्त पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत बहुजन समाज पक्षाने दिली.

बहुजन बहुजन समाज पार्टी च्या वतीने जिल्हाध्यक्ष शिरीष गोगुलवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात बहुजन समाज पार्टीचे उमेदवार नसल्याने बहुजन चळवळीतील अभिलाषा गावतुरे यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती आज श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे (बेहेरे) यांना प्रचारात साथ द्यावी असेही आवाहन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष शिरीष गोगूलवार, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साठे, चंद्रपूर विधानसभाचे बसपाचे उमेदवार लाडे, जिल्हा सचिव संजय मेश्राम, डॉ. गावतुरे आदींची उपस्थिती होती.

bottom