वाघाच्या हल्ल्यात महिला ठार शिवणी वनपरिक्षेत्रातील घटना

47

तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना आज शनिवारी शिवनी वनपरिक्षेत्रातील कुकडहेट्टी उपक्षेत्रातील पेटगाव खातेरा येथील कक्ष क्रमांक ३२२ मध्ये घडली. मृत महिलेचे नाव दिपा दिलीप गेडाम वय३३ राहनार . बाम्हणी माल असे आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. सिंदेवाही तालुक्यात मोहफुल आणि तेंदुपत्ता संकलन करण्याचे काम सुरू आहे.जंगलाशेजारी असलेल्या गावांतील महिला, पुरुष सकाळीच जंगल परिसरात जाऊन मोहफुले आणि तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम करतात. बाम्हणी येथील दिपा दिलीप गेडाम ही नेहमीप्रमाणे शिवणी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कुकडहेट्टी उपक्षेत्रातील पेटगाव खातेरा येथील जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ३२२ मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेली होती. तेथे दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिच्यावर हल्ला केला. शेजारी असलेल्या तिचा सहका-यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला. मात्र, तोपर्यंत महिलेचा मृत्यु झाला होता. घटनेची माहिती शिवनी वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमल्याने सिंदेवाही पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. सिंदेवाही पोलिस घटनास्थळी दाखल होऊन वनविभागाच्या मदतीने जमावांची समजूत घातली. मृत महिलेच्या मृतदेहाला शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालयात रवाना केले

bottom