” खिचडी ” कोण शिजविणार ? : जिल्हा प्रशासन म्हणतेयं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर येणारं : कृषी विभाग म्हणतेय त्यांचे असिस्टंट शिजवणार..

99

चंद्रपूर

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना फार काही चविष्ट खिचडी मिळत नाही.या खिचडीचा दर्जाला घेऊन पालकांनी अधूनमधून तक्रारी केल्या आहेत.आता मात्र याच खिचडीची भारी चर्चा चंद्रपुरात सुरु आहे.चर्चा होण्याचे कारण एवढेच की ही खिचडी प्रसिद्ध शेफ विष्‍णू मनोहर शिजविणार असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र कृषी विभागाने याला नकार दिला.विष्‍णू मनोहर स्वतः येणार नसून त्यांचे असिस्टंट खिचडी शिजविणार, असं सांगण्यात आलं.ही साधी खिचडी.फरक एवढाच की 6500 किलो ही खिचडी शिजवीली जाणार आहे. मात्र या खिचडीला घेऊन जिल्हा प्रशासन फारच गंभीर असल्याच दिसतंय. या खिचडीला राजकीय इव्हेंट म्हणून पुढे केले जातेयं,अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मागील दोन महिन्यापासून जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाचे उपक्रम राबविल्या गेलेत.मात्र या उपक्रमातून एका विशिष्ट राजकीय व्यक्तीला प्रमोट केल्या गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अश्यात जिल्हा कृषी महोत्सवात उद्या ( शुक्रवार ) 6500 किलोची खिचडी शिजविली जाणार आहे.खरंतर हा महोत्सव शेतकऱ्यांचा. शेती पूरक व्यवसाय करणाऱ्यांचा. तसे फार चांगले इथं स्टाल लागलेले आहेत.मात्र चर्चा आहे ती खिचडीची. ही खिचडी तरी राजकीय इव्हेंट ठरू नये, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य लोकांची आहे.

अशी आहे तयारी…

बाजरी हे मिलेट धान्‍य.या सोबतच सर्व भाज्‍यांचा वापर करून पुर्णान्‍न असलेली खिचडी तयार होणार आहे.यासाठी 10 फूट व्‍यासाची, 5 फूट कढई वापरली जाणार आहे. त्‍याकरिता सुमारे 500 किलो लाकूड वापरला जाईल. विष्‍णू मनोहर यांनी या आधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली होती. तसेच खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे, या मागणीसाठी नागपुरातील महाल भागात त्यांनी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. नुकतेच वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डीलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री. गजानन महाराजांना 6500 किलो खिचडीचा नैवेद्य सादर केला होता, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

( फोटो इंटरनेटवरून साभार )

bottom