चंद्रपूर
खरंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. चंद्रपुरातील एका कार्यक्रमात मात्र ते धीरगंभीर दिसले. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोपट म्हटलं.छगन भुजबळाना मांडीवर बसलेला बंदर म्हणत निशाणा साधला.विविध रूपात दिसणारा सांताक्लॉज चंद्रपूरातही आहे असं वडेट्टीवार म्हणालेत.चिमटा घेताना वडेट्टीवार यांनी कुणाचं नाव घेतलं नाही.मात्र निशाणा योग्य ठिकाणी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जिल्हाचे पहिले आमदार देवाजी खोब्रागडे यांची १२५ वि जयंती होती.या कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते.
चंद्रपुरात नुसते सोंग सुरु आहेत.रोज नवीन सोंग.नवीन अवतार,सांताक्लॉज जेवढ्या रूपात दिसतोय, तेवढ्याच रूपात इथले काही दिसतात, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मारला.वडेट्टीवार यांनी कुणाचं नाव घेतलं नाही.












