आगामी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकरिता सर्वच पक्ष तयारीला लागलेले असून इच्छुक नेते ही सक्रिय झाल्याचे नजरेत पडत आहे याबाबत याबाबत अधिकृत पणे कानोसा घेतला असता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी मागील दोन टर्म पेक्षाही यावेळी जबरदस्त रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर शहर भारतात सर्वत्र काँग्रेस व इंडिया आघाडीला केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात मिळालेले घणघणीत यश तसेच भारत व न्याय यात्रेमुळे एकदम भारतीयांच्या मनावर छाप पाडणारे नेते राहुल गांधी यांनी युवकांसाठी रोजगार व महागाई या दोन मुद्द्यावर घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे देशभरात काँग्रेस पक्षासाठी अनुकूल वातावरण असल्याचे राजकीय शेतात बोलले जात आहे. या वातावरणाच्या महाराष्ट्रातील विधानसभेतही फायदा होईल असा प्रयास बांधला जात असून अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तही इच्छुक उमेदवार मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मागील 2014 व 2019 मध्ये काँग्रेस पक्षाच्या चंद्रपूर क्षेत्रात महेश मेंढे यांच्या रूपाने मोठा दारून पराभव झाला होता त्यावेळी अनुक्रमे भाजपाचे नाना शामकुळे व अपक्ष किशोर जोरगेवार यांना जनतेकडून विधानसभेवर पाठवण्यात आले होते परंतु यावेळी राजकीय स्तीती वेगळी असून च्या फायदा काँग्रेस ला मिळू शकतो असा अंदाज काँग्रेस समर्थकांकडून वर्तविण्यात जात आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ला त्यांना विधानसभा क्षेत्रातून मोठे मताधिक्य मिळाले असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची साथ व मदत यावेळी काँग्रेसला विजय मिळवून देईल असा विश्वास कांग्रेस कार्यकर्त्यांना वाटतोय. तसेच खासदार प्रतिभाताई दानवे ह्या जिल्ह्यातील एक विधानसभा महिला कार्यकर्त्यांसाठी खेचून आणतील आणि तेही अनुसूचित जाति करिता राखीव असलेले चंद्रपूर क्षेत्र असेल. चंद्रपुर विधानसभेचा विचार करता मागील खूप दिवसांनी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या अनुताई दहेगावकर यांची दावेदारी पक्षश्रेष्ठीकडून काँग्रेसमध्ये प्रबळ मानली जात आहे व त्यांच्या विजय निश्चित होईल असा काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतो
हडसती घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाची डोळेझाक, शासनाला कोट्यवधींचा फटका
चंद्रपूर शहरालगत असलेल्या हडसती रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे बल्लारपूर महसूल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप...
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने मंत्री पंकजा मुंडे यांचे...
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने नियोजन भवन येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार किशोर जोरगेवार...
गरजू विद्यार्थ्यांना आधार ठरली “अम्मा की पढ़ाई”; १३ जण पोलीस सेवेत
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू करण्यात आलेल्या “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाने आणखी एक उंची गाठली असून सदर शिक्षण केंद्रातील १३ विद्यार्थ्यांची...
भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आपल्या विचारसरणी संघर्ष आणि देशसेवेच्या अखंड...
+*
भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर ती राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाच्या विचारधारेवर चालणारी एक मोठी चळवळ आहे. भारतीय जनता...
जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकार्यांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून स्वागत….. ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात नवा अध्याय जोडला गेला असून २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला...












