चिमूर विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे बंटी भांगडिया हे आमदार आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले धनराज मुंगले सातत्याने काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करत असतात, मात्र त्यांच्याकडे कुठलाही जनाधार नसल्याने व त्यांची सामाजिक कामगिरीही विशेष नसल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे मुंगले काँग्रेसच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होत आहे.
काँग्रेसच्या पराभवामागे मुंगले यांची बंडखोरी कारणीभूत आहे
मागील दोन निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार वारजूकर यांच्या पराभवामागे मुंगले यांची बंडखोरी कारणीभूत मानली जात आहे. स्वतः निवडून येण्यास अपयशी ठरणारे मुंगले, काँग्रेसचा उमेदवारही निवडून येऊ नये यासाठी प्रयत्नशील राहतात.निवडणुकीपुरते सक्रिय, इतर वेळी निष्क्रिय अशी मुंगले ची कामगिरी आहेमुंगले पाच वर्षांत मतदारसंघात कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमात सक्रिय नसतात. मात्र, निवडणुकीच्या वेळी ते सक्रिय होऊन उमेदवारीची मागणी करतात, आणि ती न मिळाल्यास बंडखोरी करतात. त्यामुळे, मागील दहा वर्षांत चिमूर मतदारसंघात भाजपचे कमळ फुलत राहिले असून याला मुंगले कारणीभूत असल्याची चर्चा चिमूर मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.












