जुगार व सट्टा व्यवसायाचा वाढता प्रभाव: कैलासवर कठोर कारवाईची मागणी

35

चंद्रपूर जिल्ह्यात जुगार आणि सट्टा व्यवसाय दिवसेंदिवस बळावत चालला असून, या अवैध धंद्याचा प्रमुख सूत्रधार कैलास आपल्या व्यवसायाची ‘दुर्ग’ तयार करत आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असली, तरी काही भ्रष्ट पोलिसांच्या मदतीने कैलास आपल्या अवैध धंद्यांना आणखी बळ देत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस विभागातील काही कर्मचारी कैलास ला या अवैध धंद्यासाठी मदत करत आहे काही पोलीसच कैलासला आगाऊ माहिती देऊन सतर्क करतात. त्यामुळे तो कारवाई होण्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी निघून जातो. या लपाछपीच्या खेळामुळे पोलीस प्रशासनाला त्याच्या मुसक्या आवळता येत नाहीत.
कैलासच्या जुगार आणि सट्टा व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. यापूर्वीही त्याच्यावर अनेकदा कारवाई करण्यात आली होती, मात्र पोलिसांतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तो पुन्हा नव्याने या व्यवसायात उतरतो. तसेच, तो लोकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करत असल्याने समाजावरही नकारात्मक परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर, आता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि कैलासच्या अवैध धंद्यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असताना, प्रशासन या अवैध जुगार साम्राज्यावर कधी निर्णायक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

bottom