चंद्रपूर भद्रावती तालुक्यातील तिरंवंजा येथे मुरूम तस्करीला ऊत; प्रदूषण आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण

39

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील अंतर्गत येणाऱ्या तिरंगा गावात मुरूम तस्करीमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या राज्यातील सर्व रेती घाट बंद असल्याने आणि रेती तस्करांवर राज्य शासनाने कडक कारवाई सुरू केल्यानंतर, तस्करांनी मुरूम तस्करीचा नवीन मार्ग शोधल्याचे स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे ही मुरूम तस्करी कोळसा खाणीच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैध वाहतूक सुरू असून, या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी, गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर धुळीचे प्रदूषण आणि अपघातांचा प्रमाण वाढले आहे.

*अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष*?

गावकऱ्यांच्या मते, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून या तस्करीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मुरूम तस्करीला बळ मिळत असून अधिकाऱ्यांवरही संशय व्यक्त केला जात आहे.

*नागरिकांची मागणी – कठोर कारवाई करा*

तिरंगा गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देत मुरूम तस्करी थांबवण्यासाठी आणि तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या मार्गावरील खड्डे बुजवून प्रदूषणमुक्त वातावरण तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

*न्यायाची अपेक्षा*

प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अन्यथा गावकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

bottom