कुप्रसिद्ध तंबाखू तस्कर जयसुख पुन्हा सक्रिय , जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पायदळी तुडविले

32

चंद्रपूर:जिल्ह्यातील सुंगधित तंबाखू, , गुटखा यावर प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा वारंवार देत आहे. दुसरीकडे सुंगधित तंबाखू तस्कर म्हणून कुख्यात ‘जयसुख’ याला तस्करीची अनाधिकृत परवानगी दिल्याची चर्चा आहे. बल्लारपुरात जयसुख याचे मोठे गोडावून असल्याची माहिती आहे. लगतच्या राज्यातून आणलेला सुगंधित तंबाखू येथे साठविला जातो.
जिल्हाधिकाऱ्यांनी सुंगधित तंबाखू तस्करांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर काही दिवस तस्करी बंद होती. या तस्करीतील मोरक्या म्हणून जयसुख पोलिस खात्यात आणि अन्न व औषध प्रशासनात ओळखला जातो.जयसुखचे मॅनेज करण्याचे कौशल्य बघता सरतेशेवटी त्यांच्यावर विश्वास टाकण्यात आला. त्यांच्याकडे सुंगधित तंबाखू तस्करीची सुत्र देण्यात आली आहे. लगतच्या राज्यात सुंगधित तंबाखू आणि गुटखा विक्रीवर बंदी नाही. तिथून ट्रक आणि इतर वाहनांनी हा सुंगधित तंबाखू बल्लारपूर येथे आणला जातो.
त्यानंतर जयसुख त्याचे जिल्हाभरात वितरण करतो. विशेष म्हणजे पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही.
त्यामुळे जिल्हाधिकारी गौडा यांचे निर्देश कुणीच गांर्भार्याने घेतले नाही.

bottom