खासदार धानोरकर यांची प्रकृती खालावली, AIR Ambulance ने दिल्ली रवाना

उपचारासाठी दिल्ली रवाना

4775

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्यातील कांग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथून विशेष Air Ambulance द्वारे पुढील उपचारासाठी दिल्ली येथे नेण्यात आले आहे.

27 मे ला खासदार धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते, 28 मे ला नारायण धानोरकर यांच्या अंत्यविधी मध्ये धानोरकर उपस्थित झाले नाही.
मागील 2 दिवसांपासून धानोरकर यांच्यावर नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज प्रकृती काही प्रमाणात खालावल्याने त्यांना तात्काळ दिल्ली येथे उपचारासाठी नेण्यात आले.

याबाबत स्वतः धानोरकर यांनी आपल्या प्रकृती बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

काल शनिवार दिनांक २७ मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परतू आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जात आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत आहे.

बाळू धानोरकर, खासदार

bottom