खासदार धानोरकर यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा

हेल्थ अपडेट

2769

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळू धानोरकर यांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती पुढे आली आहे, मागील 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, धानोरकर यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

रात्री व्हेंटिलेटरवर गेल्याने अनेकांनी त्यांची तब्येत बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती, खासदार धानोरकर हे मृत्यूशी झुंज देत आहे, मात्र आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, त्यांचं शरीर उपचाराला साथ देत असून सध्या त्यांचं ऑक्सिजन लेव्हल वाढलं आहे.

लढवय्या नेता म्हणून धानोरकर यांची ओळख संपूर्ण जिल्ह्यात आहे हे विशेष.

bottom