News34 chandrapur
चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील अवैध धंद्या संदर्भात न्यूज34 वर वृत्त झळकताच पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पथकांनी काल कोरपना तालुक्यात कारवाई केली.
गेल्या तीन महिन्यांपासून पदभार सांभाळणारे कोरपना येथील पोलिस निरीक्षक संदीप एकाडे यांनी तर हद्दच केली आहे,?मागील महिन्यात अवैध धंदे चालकाकडून मी गावाला चाललो आहो त्या करिता पुढील महिन्याची सोय आधीच केल्याची माहिती समोर आली आहे?
मागील महिन्यात ४-५ दिवस ते रजेवर गेले असता हा प्रकार घडला असल्याचे बोलल्या जात आहे, काही करा पण पैसे हवे आहे आणि पाहिजे असे त्यांनी फर्मान जाहीर केले होते? त्यांच्या या फत्व्यामुळे कर्मचारीही त्रस्त होऊन गेले होते. पण शेवटी जुळवाजुळव करून त्यांनी (तीन कर्मचाऱ्यांनी) ही हफ्ता रक्कम जमा करून दिली?
कर्मचाऱ्यांना दबाव दाखवीत असताना एका कर्मचाऱ्याला (कोरपना पोलिस) उध्दट बोलणे पोलिस निरीक्षक यांना महागात पडले असल्याचे बोलले जात आहे. त्या कर्मचाऱ्यांनी पोलिस निरीक्षक यांना “आवाज चढवु नका काम करून घ्या”या ठोकळ आवाजात त्यानेही गर्जना केली असल्याने चांगलीच फजिती झाली होती असल्याची खमंग चर्चा रंगली होती?
एकही कर्म – चाऱ्या सोबत धड न वागने, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आपली अर्वाच्य भाषा वापरणे हे काही सयुक्तिक नसल्याचे बोलल्या जात आहे. काल तर चक्क पोलिस निरीक्षक संदीप एकाडे यांनी गिंनती दरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या असल्याचे समोरं आले आहे.जर पोलिस स्टेशन च्या आवारात काय झाले काय घडले कुठले अवैध धंदे या बद्दल कोण कर्मचारी माहिती देत असेल तर त्याला मी पाहून घेईन अशी ताकीद दिली? मी वणी (अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून ओळख) येथे होतो मला सर्व माहीत आहे असे किती येते किती जाते पाहून घेऊन म्हणत धमकीवजा इशारा दिला असल्याचे गुप्त सूत्राने सांगितले आहे? न्यूज ३४ महिण्याकाठी किती हफ्ता आणि किती व्यावसायिक या बाबत लवकरच खुलासा करणार आहे?मात्र असल्या ठाणेदार असणारे खरंच पोलिस स्टेशन चालवून न्याय देतील का? असे प्रश्न चिन्ह? उभा ठाकले आहे.












