चंद्रपूर – चंद्रपूर वनविभागातील वनपरिक्षेत्र दुर्गापूर नियतक्षेत्र पायली भटाळी येथील कक्ष क्रमांक 881 मध्ये 6 जून ला सायंकाळच्या सुमारास वनविभागातील कर्मचारी गस्तीवर असताना वाघाचा मृतदेह आढळला.
सदर वाघ मादी असून तिचे अंदाजे वय 10 वर्षे असल्याचा अंदाज आहे, वाघाच्या मृतदेहाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याना दिल्यावर त्यांनी तात्काळ दुर्गापूर येथे जाऊन पंचनामा केला.
वाघाच्या मृतदेहाला प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आले, सदर वाघाचा मृत्यू वृद्धापकाळ व कार्डियोक अरेस्ट ने झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला.
मादी वाघांचे शवविच्छेदन विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, डॉ. रविकांत खोब्रागडे, बंडू धोत्रे यांच्या उपस्थिती मध्ये करीत मृतदेहाचे दहन करण्यात आले.
चंद्रपूर शहरालगत असलेल्या हडसती रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे बल्लारपूर महसूल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप...
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने नियोजन भवन येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार किशोर जोरगेवार...
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू करण्यात आलेल्या “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाने आणखी एक उंची गाठली असून सदर शिक्षण केंद्रातील १३ विद्यार्थ्यांची...
चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात नवा अध्याय जोडला गेला असून २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला...