चंद्रपुरातील टोल प्लाझा वर भीषण अपघात

भीषण अपघात

2624

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर घुग्गुस मार्गावरील धानोरा फाटा टोल नाक्यावर आज भीषण अपघात झाला, या अपघातात टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

9 जून ला दुपारी 3 ते 4 वाजेदरम्यान टोल प्लाझा वर काम करणारा 32 वर्षीय विठ्ठल भिकाजी गोवरदीपे हा रस्त्यावरील खड्ड्यात माती टाकत असताना चंद्रपूर कडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने विठ्ठल ला जोरदार धडक देत फरफटत नेले.

या धडकेत विठ्ठल चा मृत्यू झाला, विठ्ठल ला धडक दिल्यावर अज्ञात वाहनाने त्याठिकाणांहून पळ काढला, विठ्ठल हा यवतमाळ जिल्ह्यातील नायगाव वणी तालुक्यातील राहणारा होता, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करीत अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.

bottom