7 वर्षीय जिगलच्या आधार कार्डवर फोटो देवेंद्र फडणवीसांचा

चुकीने मुलाच्या आधार कार्डवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो, त्याच आधारकार्ड वर त्या मुलाला शाळेत प्रवेश मिळाला.

1839

News34 chandrapur

शंकरपूर (चंद्रपूर) : शासनाने प्रत्येकाला आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्याशिवाय कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ असो किंवा शाळेत प्रवेश काहीच मिळत नाही. त्यामुळे शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक जण आधार कार्ड काढण्यासाठी प्रथम प्राध्यान्य देतात.

प्रशासनाची घोडचूक
जिगलच्या आधार कार्ड वर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो

सिंदेवाही तालुक्यातील एका चिमुकल्याच्या आईनेही सात वर्षांपूर्वी मुलाचे आधारकार्ड काढले. मात्र त्याच्या आधारकार्डवर चिमुकल्याच्या फोटोऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आला. ही चूक तेव्हाच आईच्या लक्षात आली. मात्र अपडेट करण्याच्या घोळमध्ये सात वर्षांपासून मुलाच्या आधार कार्डवर चक्क उपमुख्यमंत्र्यांचाच फोटो आहे. एवढेच नाही तर शाळेतसुद्धा याच आधार कार्डवर प्रवेश सुद्धा घेण्यात आला.

चंद्रपुर शहरातील कस्तुरबा मार्गावर चोरी

 

या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, आधारकार्डवरील फोटो बदलण्यासाठी मुलाच्या आईने आधार केंद्रामध्ये चकरा मारणे सुरू केले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील रहिवासी असलेला जिगल जीवन सावसाकडे याचा जन्म आजोळी चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २०१५ रोजी झाला. त्याच्या आईचे माहेर शंकरपूरजवळील शिवरा येथील आहे.

 

दरम्यान, शंकरपूर येथे आधार कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिगलचे आधार कार्ड काढण्यात आले. काही दिवसांनंतर जेव्हा आधार कार्ड घरी आले, तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चिमुकल्याच्या आधारकार्डवर फोटोच्या जागी चक्क तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिगलच्या आईने आधार कार्डवरील फोटो बदलण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे त्या आधार कार्डवर आजही सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांचा फोटो असलेल्या आधारकार्डवरूनच मुलाचा शाळेत प्रवेश सुद्धा झाला. पाच वर्षांनंतर मुलाचे आधारकार्ड अपडेट करावे लागत असल्याची माहिती जिगलच्या आईला मिळाल्यानंतर आता तिने पुन्हा आधार कार्ड अपडेटसाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी मुलाच्या जन्मदाखल्यासाठी शंकरपूर ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आहे.

bottom