22 जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचं थैमान

चंद्रपूर शहरात दिनांक 18 जुलै रोजी अतीवृष्टी झाल्याने ( जवळ पास 195 mm पाऊस ) शहरातील सखल भाग आणि पुर प्रवण भागात रात्री पूर परिस्थिती उद्भवू शकते . तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणी पाणी पातळी वाढल्यास जवळच्या महानगरपालिका शाळेत आश्रय घ्यावा. आपत्ती प्रसंगी खालील क्रमांक वर संपर्क करावा फायर ऑफिस लैंडलाइन नंबर 07172254614 07172259406 (101) 8975994277 9823107101

1047

News34

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 18 ते 22 जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. यात 18 ते 20 जुलै, 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात ऑंरेंज अलर्ट असून या कालावधीत जिल्‍ह्यात सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम विजांच्‍या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. चंद्रपुरात किरीट सोमैय्या च्या प्रतिमेवर कांग्रेसचे जोडे तसेच दिनांक 21 ते 22 जुलै, 2023 या कालावधीत यलो अलर्ट जारी केलेला आहे. या कालावधीत जिल्‍ह्यात सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची अत्‍याधिक संभावना व्‍यक्‍त केली आहे.

 

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी :
संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दूर रहा. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातुन जाणे टाळा. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्‍ता ओलांडून गाडी चालवण्‍याचा प्रयत्‍न करू नका. पाणी दिसते त्‍यापेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्‍यात मोडतोड तीक्ष्‍ण किंवा धोकादायक वस्‍तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्‍या तारा असु शकतात. पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दूर रहा.

 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करु नये

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. चंद्रपूर शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

 

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

bottom