तीस गावांवर जलसंकट ओढावलं : नेते मात्र इव्हेंट करण्यात मग्न…

118

चंद्रपूर

गोंडपिंपरी उपविभागातील पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला. वीजबिलाचे सहा लाख १३ हजार ८०७ रुपये न भरल्याने महावितरण कंपनीने ही कारवाई केली. या पाचही योजनेतून तालुक्यातील तीस गावांना पाणीपुरवठा केला जात होता. आता पाणीपुरवठा ठप्प पडला. त्यामुळे एैन हिवाळ्यात पाण्यासाठी मागील पंधरा दिवसापासून गावाकऱ्यांची भटकंती सुरु आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याच सांगण्यात येत आहे .एकीकडे तीस गावातील नागरिक पाण्यासाठी दाहीदिशा भटकत असताना नेते मात्र इव्हेंट करण्यात मग्न झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविल्या जातात. जिल्ह्यात ३२ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजना कंत्राटदारांच्या माध्यमातून चालविण्यात येतात. पूर्वी राज्य शासन योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी देत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निधी देणे बंद केले आहे. त्यात पाणीपट्टी वसुलीही होत नसल्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविणे जिल्हा परिषदेला जड झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून कसेतरी या योजना सुरू आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा निधीच्या भरोवशावर सुरू आहे. सध्या निधीही नाही. त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. गोंडपिंपरी उपविभागात पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. त्यात वढोली, विठ्ठलवाडा, धाबा, चकनांदगाव आणि लाठी या गावांचा समावेश होतो. या योजनांतून जवळपास तीस गावांची तहान भागविली जाते. या योजनेचे जुलै आणि सप्टेंबर महिन्यांचे सहा लाख १३ हजार ८०७ रुपये वीजबिल थकीत आहे. थकीत वीजबिल भरण्याबाबत महावितरण कंपनीने गोंडपिंपरी उपविभागाला वारंवार कळविले होते. मात्र, निधीच नसल्याने वीजबिल तरी भरायचे कसे असा प्रश्न उपविभागापुढे होता. महावितरण कंपनीने काही महिने वाट बघतिली. मात्र, या कालावधीतही विजेचे बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने धाबा, चकनांदगाव आणि लाठी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला. त्याआधी वढोली आणि विठ्ठलवाडा येथीलही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. उपविभागातील पाचही प्रादेशिक्ष पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा सध्या ठप्प पडला. त्यामुळे या गावांतील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

bottom