समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी २३जानेवारी २०२४ रोजी सोनार समाज गडचिरोली तर्फे महिला मंडळाचा हळदी कुंकू उत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यकम चामोर्शी मार्गांवरील कात्राटवार कॉम्प्लेक्स समोरील पटागणात करण्यात आला.
या प्रसंगी सोनार समाजाचे महिला अध्यक्ष सौ. अल्का दत्रातय खरवडे , महिला सहसचिव सौ वृषाली सचिन हर्षे होत्या तसेच समाजातील महिला सदस्य सौ सौ.अश्विनी चावरे,माया भोजापुरे , सौ.सविता गजेंद्र डोमळे, सौ शुभांगी काळबांधे, सौ डॉ.शोभा काळबांधे, सौ कल्पना दिलिप काळबांधे,प्रीती हर्षे, सौ शशिकला डबांजी हर्षे, सौ जयश्री पंकज हर्षे ,सौ,शोभा यादवराव हर्षे, मंजूषा पालकर,सौ विमल यादवराव करंडे, सौ.शुषमा येवले,वैशाली भजने,स्नेहा डोमळे,आरजू हाडगे,गुडडी हर्षे,वंदू हर्षे, कुंदा कारेमोरे तसेच समाजातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या
यावेळी महिलांचा विविध सांघिग खेळाचे आयोजन करण्यात आले. तसेच सांघिक खेळातील विजयी महिलांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आभार सौ वृषाली हर्षे यांनी केले व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी चावरे, श्वेता भरणे,सविता डोमळे, वंदना हर्षे यांनी परिश्रम घेतले.












