मित्राच्या अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रपुरातील प्रसिद्ध ट्रांसपोर्ट व्यावसायिक पप्पू मल्हण याला रामनगर पोलिसांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली असुन. ही घटना काल गुरुवारला रात्री आठ वाजताच्या सुमाराला घडली. पप्पू मल्हन काल रात्री मित्राकडे मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. तेथे त्यांने येथेच्छ मद्य ठोसले. त्याला कशाचे भान उरले नाही. मित्राच्या घरातील वरच्या खोलीच्या बाजुला प्रसाधन गृह आहे. तेथे मुत्रविसर्जण करण्यासाठी मल्हण गेला. त्याच बाजुच्या खोलीत मित्राची बारा वर्षांची मुलगी होती. तिला बघताचा त्यांच्यातील राक्षस जागा झाला. तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने कशीबशी सुटका केली. तोपर्यंत मल्हाण मित्राच्या घरातून बाहेर पडला आणि आपल्या शास्त्रीनगर येथील निवासस्थानी पोहचला. दरम्यान पिडीतने आपबिती वडिलांना सांगितले. त्यानंतर वडिलाने पुन्हा पप्पूला घरी बोलविले आणि बेदम चोप दिला. त्याच अवस्थेत त्याला रामनगर पोलिसात नेले. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर भादंवी ३५४ ३५४ (अ), पोक्सो आणि अनुसूचित जाती, जनजाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पप्पू हा शहरातील एका बड्या कोळसा व्यावसायिकांच्या नातेवाईक आहे.












