शहर पोलिसांची केला सेक्स रँकेटवर धाड

67

चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली. तर, या कुंटणखान्यातून एका पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका करण्यात आली. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. प्रणय गेडाम असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे.
रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅटमध्ये तो विविध युवतींना आणून कुंटणखाना चालवित होता. रोज नवनवे लोक येत असल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची कुणकुण फ्लॅटमधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी सुरुवातीला संशयित फ्लॅटमध्ये डमी ग्राहक पाठविला. खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आले. यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली. तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले. तिची या कुंटणखान्यातून सुटका करण्यात आली. तर दलाल प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

bottom