अरे देवा…! सासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरच बिमार : पाच डॉक्टरांना डेंग्यू : आरोग्य विभागात खळबळ

58

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोडमळली असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात निर्माण झालेलं असताना चंद्रपूर व्यद्यकिय महाविद्यालयातील डॉक्टरच बिमार असल्याचे सत्य पुढे आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. एक दोन नव्हे तब्बल पाच डॉक्टर डेंग्यू आजाराने ग्रासले आहे. यातील एक डॉक्टर गंभीर स्थितीत असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.कस्तुरबा मार्गांवर निवासी वैद्यकीय अधिकारी वस्ती गृह आहे. या वस्तीगृहात असलेल्या पाच डॉक्टर, दोन नर्सिंगच्या विध्यार्थी आणि चौकीदारला डेंगू झालाय.जिथे निवासी डॉक्टर राहतात त्या वस्ती गृहात अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्या सोडवण्याची वारंवार मागणी निवासी डॉक्टरांनी केली. मात्र त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करण्यात आला. इतरांचे आरोग्य जोपासणारे डॉक्टरच बिमार झाले आहेत. ही मोठीच शोकांतिका आहे.

bottom