धानोरकांच्या मंडपात भावी उमेदवारांची गर्दी तर वडेट्टीवारांचा मांडव मोकळा

53

*पवन झबाडे*

 

काळ बदलला की वेळ बदलतो. राजकारण सुद्धा त्याला अपवाद नाही. याची प्रचिती काल मंगळवारला चंद्रपुरात शहराती हजारो गणेशभक्तांनी घेतली. गणेश मंडळाच्या स्वागतासाठी खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थिती असलेल्या स्वागत मंडपात विधानसभेचे इच्छुक उमेदवार आणि कॅंाग्रेस कार्यकर्त्यांची तुफान गर्दी होती. मात्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाऊंडेशनच्या मंडपात शुकशुकाट बघायला मिळाला. राजकारणात दिवस बदलले की कार्यकर्ते सुद्धा बदलतात. याचा अनुभव सुद्धा या निमित्ताने आला.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या वादावरून खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. वडेट्टीवार त्यांची मुलगी शिवानीसाठी आग्रही होते. पक्षाने वडेट्टीवार यांच्या हातात एबीफार्म सोपविला. मात्र वडेट्टीवार रिंगणात उतरण्याएेवजी माघारी फिरले. त्यानंतर धानोरकर यांना उमेदवारी मिळाली आणि पुढचा इतिहास घडला. त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांच्या विजयानंतर मागील तीन महिन्यांपासून वडेट्टीवार चंद्रपूर शहरात फिरकले नाही. याकाळात विविध सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र ते दूरच राहिले. त्यामुळे त्यांच्या मागे असलेले कार्यकर्ते अक्षरशः पोरके झाले आहे. वडेट्टीवारांची वाट बघून थकलेल्या कार्यकर्त्यांनी आता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे. विजयकिरण फाऊंडेशनच्या कोणत्याही कार्यक्रमात वडेट्टीवार समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी असायची. याला अपवाद कालचा दिवस ठरला. सार्वजनिक गणेश विसर्जन झाले. या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाचे स्वागत करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी विसर्जन मार्गावर मंडप उभे केले होते. यात विजय किरण फाऊंडेशनचा मंडप आणि कॅांग्रेसचा मंडप अवघ्या ५० मीटर अंतरावर होते. मात्र खासदार धानोरकर दुपारी ४ते रात्री १२ पर्यंत या मंडपात बसून गणेश मंडळांचे स्वागत करीत होत्या. त्यांच्या या मंडपात विधानसभेसाठी इच्छुक सर्वच उमेदवारींना भेट दिली. त्यांच्या सोबत होते. या मंडपात तुफान गर्दी झाली होती. बसायला जाता नव्हती. दुसरीकडे हाकेच्या अंतरावरील विजय किरण फाऊंडेशनच्या मंडपात कॅांग्रेसचे पदाधिकारी, वडेट्टीवार समर्थक आणि इच्छुक उमेदवारांनी जाणे टाळले. या दोन्ही मंडपात उपस्थिती सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. राजकारणात कट्टर समर्थक या शब्दालाच तडा देणारा आहे.

bottom