चंद्रपूर -: शिकवणीच्या नावावर विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

41
Oplus_131072

 

उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून काल मंगळवारी, रात्री कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्याची माहिती आहे.अमोल लोडे हा कोरपना येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता. यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. मात्र, भीतीपोटी त्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही. दरम्यान,आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिताने घाबरून ही माहिती कुणालाही दिली नाही. दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी पीडिताला विचारले असता तिथे आपबीती कथन केली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक तात्काळ आरोपीच्या शोधात निघाले आरोपी हा जिल्हा बाहेर पडून गेला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला मिळाली. पोलिसांनी अकोला पोलिसांशी संपर्क साधला व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोल्याला रवाना झाले दरम्यान अकोला येथून आरोपी शिक्षकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करत आहे

bottom