फ्लेक्स, फटाके नाही… वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

38

सामान्यतः वाढदिवस म्हटला की पार्टी, केक, फटाके, मोठे फ्लेक्स, सोशल मीडियावरील पोस्ट आणि प्रसिद्धी याचा सुळसुळाट असतो. मात्र चंद्रपूरमधील तुकूम परिसरातील रहिवासी अभिषेक गजानन डोईफोडे या युवकाने आपल्या वाढदिवसाला एक वेगळी दिशा देत समाजासाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी कोणतेही गाजावाजा न करता, स्वखर्चातून आरोग्य शिबिराचे आयोजन करत परिसरातील नागरिकांची मोफत तपासणी करून औषधोपचार व आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयांमध्ये चकरा माराव्या लागल होत्या नागरी स्वीकार समोरच्या या सर्व समस्या पाहता अभिषेक डोईफोडे यांनी थेट वॉर्डातच आरोग्य शिबिर आयोजित केले.या उपक्रमात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, नेत्रतपासणी अशा विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरजू नागरिकांना औषधे व आरोग्यविषयक आवश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या.
वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत समाजात एक सकारात्मक संदेश देणारी ठरली असून अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले आहे. एकीकडे केवळ प्रसिद्धीसाठी वाढदिवस साजरा केला जातो, तिथे अभिषेक डोईफोडे यांनी सामाजिक भान ठेवत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा सार्थ उपयोग केला.
या उपक्रमामुळे परिसरातील अनेक गरजू नागरिकांना उपचाराची सोय घराजवळ वार्डातच झाली असून, “वाढदिवस समाजासाठी” या विचाराला बळ मिळाले आहे. सामाजिक बांधिलकीचे भान जपणाऱ्या अशा युवकांकडून अनेक तरुणांना प्रेरणा घेण्यासारखी बाब आहे.

bottom