पावसाने त्रस्त नागरिक, पण तलाठी मोडकवार बेफिकीर – कारवाईची मागणी

28
Oplus_131072

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शहरासह गावखेड्यांत मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर शहरालगतच्या चिंचाळा गावातही नागरिकांचे हाल झाले असून काहींच्या घरांचे नुकसान झाले तर काहींना दैनंदिन जीवनात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या समस्यांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी गावकरी सतत प्रयत्न करत असले तरी येथील तलाठी मोडकवार मात्र नागरिकांच्या संपर्काला प्रतिसाद देत नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.नागरिक सांगतात की, ते आपली समस्या मांडण्यासाठी मोडकवार यांना वारंवार फोन करतात, मात्र ते फोन उचलत नाहीत. जर भेट झाली तरी ते अरेरावीची भाषा करतात, कामाकडे दुर्लक्ष करतात आणि मुद्दाम वेळकाढूपणा करतात.
यामुळे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून गावकरी म्हणतात की, “नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा व्हावा, समस्या प्रशासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो; पण तलाठीच प्रतिसाद देत नसल्याने आम्ही त्रस्त आहोत.”

*गावकऱ्यांची मागणी* :

तलाठी मोडकवार यांच्यावर तात्काळ कारवाई करावी

अन्यथा लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल

पावसामुळे आधीच अडचणीत असलेल्या चिंचाळा गावकऱ्यांना स्थानिक प्रशासनाकडून साथ मिळावी, मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. मात्र तलाठ्यांच्या निष्क्रीय वर्तनामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

bottom