स्वघोषित ‘शिक्षण सम्राट’ पांडू आंबट अडचणीत – पालक व विद्यार्थ्यांमध्ये संताप, कारवाईची मागणी

42

चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यवसायावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्वतःला शिक्षण सम्राट म्हणवून घेणारा पांडू आंबट याच्यावर विद्यार्थ्यांची व पालकांची दिशाभूल केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.आंबट हा विद्यार्थ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून आपल्या संस्थेत प्रवेश देत असल्याचा व नंतर फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रारी केल्या. यापूर्वीदेखील अशा प्रकारचे प्रकरणे उघडकीस आली होती, ज्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. तथापि, सर्व टीका व आरोपांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांचा गैरफायदा घेण्याची पद्धत कायम सुरू असल्याचे आरोप होत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत फक्त स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रकार पालक व समाजाला असह्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालक, विद्यार्थी तसेच समाजातील विविध स्तरांतून पांडू आंबट व त्याच्या संस्थेविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनानेही याबाबत गांभीर्याने विचार करून योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे पांडू आंबट याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे गुन्हे दाखल होतात हा रुग्णालयात भरती होतो व प्रकृती अस्वस्थ असल्याचा कारण समोर करतो मात्र यावेळी असे काही होणार नाही आणि लवकरच पांडू आंबट याला त्याची जागा दिसेल

bottom