पोलिसांना वाकोल्या देत सट्टा चा बाजार – चंद्रपुरातील पाणी टाकी परिसरातील प्रकार

30

नागपूर मार्गावरील प्रियदर्शनी चौकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ सट्ट्याचा व्यवसाय उघडपणे सुरू असून, तो थेट पोलिसांनाच आव्हान देत असल्याचे दिसत आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या या चौकात एका युवकाने सट्ट्याचे बसस्थानच उघडले आहे.विशेष म्हणजे, या परिसरातून अनेक नागरिकांची वर्दळ असते. येथे न्यायाधीशांचे बंगले, शासकीय कार्यालये आहेत आणि अनेक पोलीसही या परिसरात नेहमी वावरत असतात. तरीदेखील सट्टा व्यवसायिकाचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की तो उघडपणे सांगतो मी सर्वांना मॅनेज करतो, आता काय करायचं ते करू द्या”.याच मार्गावरून जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही नियमितपणे ये-जा करतात. तरीदेखील पोलिसांकडून जाणीवपूर्वक या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. अनेक नागरिकांनी यापूर्वी तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही.
या सट्टा व्यवसायामुळे शहरातील प्रतिष्ठेवर विपरीत परिणाम होत असून, नागरिकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून तत्काळ कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.

bottom