चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू झाली असून, नगीनाबाग प्रभागामध्ये जोरदार चुरस रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रभागातून महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व स्थायी समिती माझी सभापती राहुल पावडे यांना आव्हान देण्यासाठी शिवा कोरवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
शिवा कोरवार हे मागील अनेक वर्षांपासून या प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर काम करत आहेत. मूलभूत सुविधांच्या उभारणीपासून ते नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यापर्यंत त्यांनी सातत्याने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून दिलासा दिला आहे. तळागाळातील नागरिकांशी घट्ट नातं जपणारे कोरवार आता निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असून, त्यांनी भाजपचे माजी महानगराध्यक्ष राहुल पावडे यांना थेट आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे.या पार्श्वभूमीवर नगीनाबाग प्रभागातील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार बनली असून, नागरिकांमध्येही निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवा कोरवार यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील लढत अधिकच तापदायक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.












