चंद्रपूर : एकोरी प्रभागातील या मार्गाचे डांबरीकरण तातडीने करावे — यशश्री फाउंडेशनकडून आमदारांना किशोर जोरगेवार यांना निवेदन

27

चंद्रपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट या प्रमुख मार्गाचे डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे, या मागणीसाठी यशश्री फाउंडेशनतर्फे निवेदन देण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा ललित कासट यांच्या नेतृत्वात हे निवेदन चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार यांना सादर करण्यात आले.
उपरोक्त मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था अत्यंत नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक तसेच एकोरी प्रभागातील रहिवाशांनी ही समस्या फाउंडेशनच्या अध्यक्षांकडे मांडली होती.याबाबत महानगरपालिकेमार्फत चौकशी केली असता, ‘अमृत-2’ योजनेतील कामामुळे रस्त्याचे डांबरीकरण रखडले असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर कामाला गती देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी दीपा ललित कासट यांनी आमदारांकडे निवेदनामार्फत केली.
निवेदनादरम्यान, या मार्गावरील तसेच प्रभागातील इतर रखडलेल्या विकासकामांना तात्काळ गती देण्यात यावी, अशी मागणीही यशश्री फाउंडेशनतर्फे करण्यात आली.

bottom