चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत शहराच्या मध्यभागी असलेले एकोरी प्रभागातील सर्व जाती धर्माचे लोक असल्यामुळे एकोरी प्रभागातील निवडणुकीला दीपा ललित कासट यांच्या उमेदवारीमुळे वेगळीच रंगत मिळाली आहे
सभा व कॉर्नर बैठकींच्या माध्यमातून प्रचाराचा झंझावत सुरू केला आहे. या सभांमधून विकासकामांच् मुद्या वरून श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. सभांना होत असलेली नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी विजयाचा विश्वास अधिक दृढ करणारी असल्याचे दीपा ललित कासट यांनी सांगितले.
एकोरी प्रभागातील प्रश्नांचा अभ्यास, नागरिकांच्या समस्या आणि विकासात्मक मुद्दे घेऊन त्या महानगरपालिकेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डोर तू डोर प्रचार करत जागोजागी नागरिकांचा श्री छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पॅनल चे उमेदवार यांना भर भरून जनतेच्या उत्सुक असा प्रतिसाद मिळत आहे
दीपा ललित कासट यांनी प्रभागातील बुद्ध विहार मधील सभा घेऊन नागरिकांचे समस्या जाणून घेतल्या या बैठकीमध्ये समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
नागरिकांच्या थेट सहभागामुळे आणि सकारात्मक प्रतिसादामुळे दीपा ललित कासट यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.












