वादळी वारा सुरू आणि ती झाडाखाली थांबली अनं मृत्यू कोसळला

वादळी वाऱ्याने झाड कोसळले

1829

News34 chandrapur

कोरपना : चंद्रपूर जिल्ह्याला दिवसेंदिवस वाढत्या तापमानाचा तडाखा बसत असून नागरिक पावसाची वाट बघत आहे, 10 जून ला जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्याला सुरुवात झाली मात्र त्यासोबत एक वाईट बातमी सुद्धा आली.

कोरपना तालुक्यात आज दुपारी प्रचंड वादळी पावसाचा तडाखा आला. दरम्यान वडगाव येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला.

वडगाव येथील शेतात कामाला गेलेल्या वैशाली गोवर्धन उरकुडे (वय 35) या महिलेवर झाड कोसळून जागीच मृत्यू झाला. गुलाव जिवतोडे यांच्या शेतात सरकी टिबायला सदर महिला गेली होती. आज 10 जून रोजी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे ती झाडाखाली थांबली. तेव्हा झाड कोसळून तिचा मृत्यू झाला.

bottom