चंद्रपुर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कांग्रेस च्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जवळपास अडीच लाख मताधिक्क्याने पराभव केल्याने अनेकांना सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव पचणी पडला नाही, कारण जवळपास 35 वर्ष राजकारणात असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले आणि जनतेच्या असंख्य प्रश्नांना त्यांनी आपल्या लढवय्या सेवाभावी स्वभावाने वाचा फोडली त्या तुलनेत आमदार प्रतिभा धानोरकर यांचे कुठलेही मोठे कार्य नसताना त्यांच्याकडून सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव होणे हे अत्यंत धक्कादायक बाब म्हणावी लागेल. मात्र याची कारणमिमांसा होणे महत्वाचे झाले आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात यावर्षी सुद्धा कांग्रेस ने अभूतपूर्व यश संपादन केलं खरं, पण यावेळी ही निवडणूक एका वेगळ्या करणाने गाजली, ती म्हणजे “जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान धोक्यात येईल आणि मोदी सरकार संविधान बदलून टाकेन व मग आरक्षण पण संपेल” खरं म्हणजे कांग्रेस च्या शीर्ष नेत्यांनी पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधितज्ञ ॲड. असिम सरोदे यांच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळण्याअगोदर गांधी चौक व न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात सभा घेतल्या व या सभामधून भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास सुरुवात झाली. भाजपने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ज्यावेळी उमेदवारी जाहीर केली होती त्यावेळी कांग्रेसचा उमेदवार ठरायचा होता, मात्र उमेदवार ठरायच्या अगोदर भाजप विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली व सामाजिक माध्यमावर भाजप ला कांग्रेस कडून व त्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्या व कार्यकर्त्याकडून ट्रोल करणे सुरु झाले. या दरम्यान कांग्रेस चा उमेदवार प्रतिभा धानोरकर की शिवानी वडेट्टीवार याबाबत शीतयुद्ध खेळलं गेलं पण शेवटी कांग्रेस च्या उमेदवारीची माळ आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या गळ्यात पडली.
भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार व कांग्रेस च्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात जी लढत होईल त्यात सुधीर मुनगंटीवार हे एकतर्फी निवडणूक जिंकेल अशी चर्चा होती, कारण भाजपने “अबकी बार चारसो पार” चा नारा दिला होता त्यात ही पण शीट असेल असे सर्वाना वाटतं होते, पण कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधितज्ञ ॲड. असिम सरोदे यांना लोकसभा क्षेत्रातील सगळ्या शहरी भागात सभा घ्यायला लावल्या व त्या सभामधून भाजपच्या संविधान विरोधी नीती विरोधात आणि मोदींचे व्यापारी धोरण, देशपातळीवर पेट्रोल, डिझेल, व गॅस सिलेंडरची दरवाढ़ आणि देशविरोधी निर्णय विषद करून त्याचे वाभाडे काढणाऱ्या अनेक बाबी उघड केल्याने मोदी विरोधात व भाजप उमेदवार विरोधात वातावरण तापवले. याचा फायदा कांग्रेस उमेदवाराला असा झाला की राष्ट्रीय पातळीवरचा असा कुठलाही बडा नेता प्रचारदारम्यान चंद्रपूरला आला नसताना केवळ पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधितज्ञ ॲड. असिम सरोदे यांच्या सभामधून जे वातावरण निर्माण झाले त्या वातावरणातून कांग्रेस ची मोठी हवा निर्माण झाली हे कुणीही नाकारू शकत नाही.












