- कांग्रेस नेत्या अनुश्री दहेगावकर यांचा पुढाकारातुन सार्ड संस्था चंद्रपूर च्या विद्यमाने “एक पेड पर्यावरण के नाम” च्या अनुषंगाने सार्ड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रकाशजी कामडी यांची आज (दिनांक १३ जुलै) पुण्यतिथी निमित्त सार्ड संस्थेच्या वतीने पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आहे.
मानव आपल्या गरजा भागविण्यासाठी सतत पर्यावरणाची हानी करत आहे.दिवसेंदिवस अंधाधुंद जंगलतोड होत आहे.औद्योगिकिकरण आणि रिअल इस्टेटच्या प्रभावाखाली हिरवळ नष्ट होत आहे.ही हिरवाई परत आणण्यासाठी सार्ड संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी सार्ड संस्थेच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले जातात.
आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सोसायटी तुकुम येथे सार्ड संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.वृक्षारोपणामध्ये गुलमोहर,चाफा,बहावा,
सप्तपर्णी,बेल आदींचा समावेश होता.
वृक्षारोपणाप्रसंगी सार्ड संस्थेचे अध्यक्ष भाविक येरगुडे,कार्यक्रमाचे प्रमुख विलास माथनकर,सुबोध कासुलकर,रविजी पचारे,श्रीमती सुवर्णा कामडे,संजय जावडे, माजी नगरसेवक सेविका सौ.सुनीता लोढीया, माजी नगरसेवक सुरेश पचारे,सामाजिक कार्यकर्ता सौ.अनुताई दहेगावकर,मोहन चौधरी,डॅनिअर रंगारी,मारोतराव रायपुरे, अरविंद रायपुरे, सचिन ढेंगरे, सचिन धोटे,कपिला मेश्राम, रिना रायपुरे,भास्कर भागवत, इंद्रजित रायपुरे,प्रदीप रत्नपारखी,किरण निमरड,वनिता भागवत,प्रशांत देवगडे, शिल्पा देवगडे, सचिन मेश्राम,वारलू रायपुरे, रंगारी मॅडम,सचिन रामटेके, शुभांगी मेश्राम,श्याम नक्षीने
आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास माथनकर,भाविक येरगुडे,अनुताई दहेगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.












