मोहरम निमित्य स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनुताई दहेगावकर यांचा हस्ते शरबत वाटप

49
Oplus_0

चंद्रपूर :- मोहरम Moharam Festival निम्मित चंद्रपूर कारागृहातिल हजरत मखदुम उर्फ गैरीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनुताई दहेगावकर यांनी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शरबत वितरण केले. Congress Women’s Front

हजरत हुसेन रजी हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामुळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दहावीला चंद्रपुरातील कारागृहात असलेल्या हजरत मखदुम उर्फ गैरीशाह वली यांचा दर्गा सर्व सामान्य जनतेसाठी खुला करण्यात येतो.
मोहरमच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यानिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शरबत वाटप करण्याचे काम स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनुताई दहेगावकर यांनी केले.
bottom