- चंद्रपूरात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरातील विविध मागण्यांसाठी निघाला आक्रोश मोर्चा, डॉ. दिलीप कांबळे यांनी केले नेतृत्व
चंद्रपूरात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या भित्ती चित्राला माल्यार्पण करून मोर्चाचा प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेस चे जेष्ठ नेते डॉ. दिलीप कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. 7 वर्षे रखडलेली अमृत पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू व्हावी, शहरातील झोपडपट्टी धारकांना घरासाठी स्थायी पट्टे देण्यात यावे, ओबीसी बांधवांना घरकुल योजना लागू करावी, पिढी उद्धवस्त करणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांवर कठोर कारवाई करावी, बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्ण करावे अशा मागण्या मोर्चाच्या निमित्ताने पुढे रेटण्यात आल्या.












