घुगुस येथील शाळा अदानी ग्रुपला हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय

50

 

 

घु्ग्गूस माउंट कार्मेल शाळा अदानी ग्रुपला हस्तांतरित करण्याच्या निर्णयावर राज्य शासनाने अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

शासनाने याबाबत एक परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये संबंधित शाळेचे व्यवस्थापन अदानी ग्रुपकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शाळेच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या हेतूने हे पाऊल उचलले असल्याचे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अदानी ग्रुपच्या सहकार्यामुळे शाळेचा विकास व गुणवत्ता सुधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तथापि, स्थानिक नागरीक आणि पालक वर्गाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की शाळेच्या खासगीकरणामुळे सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होईल आणि शिक्षणाची गुणवत्ता व्यवसायिक दृष्टिकोनातून मोजली जाईल.शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे आकारेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

bottom