मुल – ‘बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरताना मुल शहरात बाजार चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून विजयाची खात्री दिली.
उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल,सौ. सपनाताई मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जि प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, अल्का आत्राम, विद्याताई देवाळकर, डॉ. मंगेश गुलवाडे, रत्नमाला भोयर,चंदू मार्गोनवार, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, विनोद देशमुख, राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, रामपाल सिंह, हनुमान काकडे, राजू बुद्धलवार, किशोर पंदीलवार, निमगडे गुरुजी, वंदना आगरकाटे,रोशनी खान, सुलभा पीपरे ,खेमा रायपुरे,पूजा डोहने,वर्षा लोनबले, किरण गापगते, मंगेश पोटवार, विशाल नागुलवार यासह आदि भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आणखी एक पाऊल आज टाकत आहे. माता महाकालीचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज झालो आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादाची ऊर्जा माझ्यासोबत आहे. सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहताना जनकल्याणाचा वसा पुढे चालविण्याचे ध्येय आहे.’ विकासाचा झंझावात कायम ठेवून बल्लारपूर मतदार संघ राज्यात अव्वल ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मनाचे ऐका. आपल्याला पुढील पाच वर्षे दुःखात घालवायची आहेत की आनंदात, याचा विचार करा, असे आवाहन करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या निवडणुकीत मी तुमचा उमेदवार म्हणून उभा नाही तर तुम्हीच सारे उमेदवार आहात, या शब्दांत जनतेच्या हृदयाला स्पर्श केला.
चंद्रपूर शहरालगत असलेल्या हडसती रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे बल्लारपूर महसूल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप...
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने नियोजन भवन येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार किशोर जोरगेवार...
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू करण्यात आलेल्या “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाने आणखी एक उंची गाठली असून सदर शिक्षण केंद्रातील १३ विद्यार्थ्यांची...
चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात नवा अध्याय जोडला गेला असून २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला...