चंद्रपूर जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या शिवनी चोर गावातील घाटावर अवैध रेती तस्करीने जोर धरला असून, रात्रौच्या वेळी जेसीबी, हायवा आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे.सध्या राज्यभरातील रेती घाटांवर बंदी असतानाही शिवनी चोर घाटावर ही बंदी पूर्णतः धाब्यावर बसवून रेती तस्करांचे सत्र सुरू असल्याचे चित्र आहे. या अवैध तस्करीमुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून, धूळ, आवाज आणि अपघाताचा धोका वाढला आहे.गावकऱ्यांनी अनेकदा महसूल विभाग व पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, नागरिकांच्या मते काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची तस्करांशी संगनमत असल्यामुळे तस्करीला अभय मिळत आहे.या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी आता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली असून, “या तस्करीमुळे आमचा जीव टांगणीला लागला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी,अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.
Home Breaking News चंद्रपूर जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या शिवनी चोर गावातील घाटावर अवैध रेती तस्करी उफाळली;...
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्याने अनाथ मुलाचे स्वप्न साकार; खुशाल गेडाम...
चंद्रपूर - मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या या...
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी घेतले माता...
चंद्रपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-2026 अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली...
चंद्रपूर शहरातील रहमतनगरमध्ये सरकारी धान्याचा काळाबाजार?; पुरवठा विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
चंद्रपूर शहरातील रहमतनगर परिसरात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) मिळणाऱ्या सरकारी धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून गरीब...
शिवनी चोर घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल प्रशासनाची डोळेझाक, शासनाला कोट्यवधींचा...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या शिवनी चोर रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत...
चंद्रपूर शहर में अवैध गैस रिफिलिंग का काला कारोबार , गैस...
देश में इन दिनों ईंधन की भारी कमी देखी जा रही है। घरेलू और व्यावसायिक गॅस सिलेंडर लोगों को समय पर उपलब्ध नहीं हो...












