चंद्रपूर तहसील प्रशासनाची रेती तस्करीवर धडक कारवाई – भरारी पथकाची नियुक्ती, तस्करीच्या मार्गांवर खड्डे

32

राज्य सरकारने रेती घाटांवर रेती उपसास बंदी घातली असताना देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या. याची गंभीर दखल घेत चंद्रपूर तहसीलदार विजय पवार यांनी रेती तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथकाची स्थापना केली आहे.
या भरारी पथकात दररोज वेगवेगळे कर्मचारी सहभागी होत असून त्यांनी नुकतीच चंद्रपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या काही रेती घाटांवर कारवाई करत रेती तस्करी केल्या जात असलेल्या मार्गावर खड्डे खोदले. तस्करीसाठी वापरले जाणारे मार्ग प्रशासनाने बंद केले आहेत. हे रस्ते खड्यांमुळे बंद झाल्याने तस्करी करणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या उपाययोजनांमुळे रेती तस्करीस मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

bottom