चंद्रपूर महा औष्णिक वीज केंद्रात भ्रष्टाचाराचे जाळे आणखी घट्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, आणि यामागचा प्रमुख सूत्रधार म्हणजे उपयंता भूषण! ठेकेदारांबरोबर लॉगिन करून ‘माया गोळ’ खेळण्यात व्यस्त असलेला हा भूषण, वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करत स्वतःच्या स्वार्थासाठी यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
भूषणच्या या कारनाम्यांमुळे केवळ अधिकारीच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेतेही त्रस्त झाले आहेत. प्रत्येक व्यवहारात स्वतःचा हिस्सा पाहणारा हा भूषण, वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरवून त्यांचाही विश्वासघात करत असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, भूषणच्या या कर्माचे फळ मागील अभियंतांना भोगावे लागले असून, त्यांचे अचानक स्थलांतरण करण्यात आले. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो — भूषण अजून किती अधिकाऱ्यांना अडचणीत आणणार? यामुळे या भूषणला लवकरात लवकर त्याची जागा दाखवावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांपासून ते स्थानिकांपर्यंत होत आहे. आता पहायचं, भूषणवर कारवाईची वीज केव्हा कोसळते!












