भद्रावती पोलिसांची कारवाई : १ किलोहून अधिक गांजासह युवक अटकेत; मात्र अचानक झालेल्या पोलीस निरीक्षकाच्या बदलीने नागरिकांत संताप

38

भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबविणाऱ्या पोलिसांना पुन्हा एकदा यश मिळाले असून, एका युवकाकडून तब्बल १ किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक लता वाढवे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन डोंगरे, महेंद्र बेसारकर, चंदू नागरे, धर्मराज मुंडे, अनुप कुमार, धर्मराज झाडे आणि खुशाल कावडे यांच्या पथकाने केली.गत काही महिन्यांपासून भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात कठोर पावले उचलली जात होती. पोलिस निरीक्षक लता वाढवे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने गांजा, दारू, अवैध रेती, कोळसा तस्करी, कोंबडा बाजार, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे अशा अनेक गुन्हेगारांवर कारवाया करून गुन्हेगारीवर लगाम आणण्यात यश मिळवले होते.
मात्र, अचानक लता वाढवे यांची बदली करण्यात आल्याने भद्रावतीतील नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजीचे वातावरण आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे स्थानिक गुन्हेगारीला आळा बसला होता, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.दरम्यान, अटक करण्यात आलेला युवक क्षितिज संजय जुंगरे असून, त्याच्याविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

bottom