भाजपाच्या सेवा सप्ताहात मुस्लिम समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; 55 मुस्लिम बांधवांचे रक्तदान

38

भाजपा अल्पसंख्यांक आघाडी (मुस्लिम समाज)च्यावतीने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाच्‍या निमित्ताने प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात सुभाष कसनगोट्टूवार यांच्या नेतृत्वात पार पडले.
या शिबिरात मुस्लिम समाजातील ५५ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक एकतेचे आणि जनसेवेचे आगळेवेगळे उदाहरण सादर केले. विशेष म्हणजे या रक्तदात्यांमध्ये मुस्लिम महिलांचाही लक्षणीय सहभाग होता, ज्यामुळे समाजातील महिला सशक्तीकरणाचाही प्रभावी संदेश मिळाला.या ऐतिहासिक उपक्रमात उपस्थित असलेले भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते:
राशेद हुसैन, चांद सैय्यद, सोहेल शेख, राजिक खान, इमरान खान, असलम शेख, सैय्यद अबरार, जफर सिद्दीक़ी, शकील शेख, असलम खान, मोहम्मद इरशाद, जफर बेग, साजिद मिर्ज़ा, स्वागत सोनुले, कौसर खान, हमीदा सैय्यद, राबिया खान, आसिया सैय्यद, नाजिरा शेख.
हा उपक्रम अल्पसंख्यांक समाजाचा भाजपप्रती वाढता विश्वास, सकारात्मक विचारधारा व सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम प्रतीक ठरला आहे.

bottom